भुसावळ येथे विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप-तप कार्यक्रम संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) -:
येथील मातृभूमी चौकातील सुराणा स्वाध्याय भवनात नूतन वर्षानिमित्त विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप-तप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. प.पू. जिनशासन प्रभावक उपाध्याय प्रवर गुरुदेव डॉ. गौतम मुनीजी म.सा. तसेच सेवा भावी वैभव मुनीजी म.सा. आदी ठाणे-दोन यांच्या पावन सानिध्यात हा कार्यक्रम दि. १ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पार पडला.

या प्रसंगी विश्वशांतीसाठी महामांगलिक, जप, तप व आराधना करण्यात आली. मालेगाव, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, भुसावळ व जळगाव येथील सुमारे सहाशे ते सातशे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना गौतम प्रसादी देण्यात आली. हा दिवस एकासना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघपती जयंतीलाल सुराणा यांच्यासह जे. बी. कोटेचा, सुगनचंद सुराणा, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया, अतुल ताथेड, राजेश बाफना, विनोद मेहता, राजेश सुराणा, संजय नाहाटा, सुरेशचंद्र कुमट, राजेंद्र मेहता, राकेश चोपडा, विशाल चोरडिया, अशोक डोशी, नितीन सुराणा, राजू कोटेचा, अजय कोटेचा, सुमित चोरडिया, उपेंद्र खिवसरा, अशोक सुराणा, रविंद्र निमाणी, अभय सुराणा, गल्लूदास छाजेड, प्रभावती सुराणा, विमल कोटेचा, भावना चोरडिया, पारस नाहाटा, किरण कोटेचा, अनिता कोटेचा, ममता कोटेचा आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते.

या आध्यात्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय व शांततेचे वातावरण निर्माण झाले.