निधन वार्ता: वैद्य उषाताई जळूकर:


भुसावळ, (प्रतिनिधी ता. २७) : येथील मुळ रहिवासी वैद्य उषाताई श्रीकर जळूकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने चाळीसगाव येथे निधन झाले. प्रसिद्ध वैद्य स्व. डॉ श्रीकर उर्फ तात्या जळूकर यांच्या पत्नी असलेल्या उषाताई स्वतः घरी आयुर्वेदिक औषधे बनवित असत. आयुर्वेद संशोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. जळूकर कुटुंबियांची निस्वार्थी जनसेवेची परंपरा जपून त्यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या रविंद्र जळूकर व सुश्रुत जळूकर, ज्योती जळूकर-बनसोड यांच्या आई होत.