संविधान दिनानिमित्त तालुका विधी सेवा समितीतर्फे भुसावळ कारागृहात कायदेविषयपर मार्गदर्शन:

, भुसावळ (प्रतिनिधी ) : तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांचे आदेशान्वये दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी भुसावळ कारागृह येथे संविधान दिनानिमित्त न्यायालयीन बंदी यांचेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये तालुका विधी सेवा समितीचे पॅनल विधीन्य दिपक कोळी, अधिक्षक एस एस सोनवणे व कारागृह अधीक्षक हे उपस्थित होते. तसेच वरिष्ठ लिपीक जी यु वारूळकर व कनिष्ठ लिपीक जी ए निंबोळकर व कारागृहातील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.