पुणे विभागात 27 नोव्हेंबर रोजी रेल्वेचा ब्लॉक : आठ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम –

भुसावळ (प्रतिनिधी) : पुणे विभागातील दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत रांजणगांव-सारोळा स्टेशनदरम्यान अप-डाऊन मुख्य मार्गांवरून प्रस्तावित अप मुख्य मार्गाकडे कट अ‍ॅण्ड कनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 27 नोव्हेंबर रोजी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम पुणे विभागातील व भुसावळ विभागातून धावणार्‍या आठ रेल्वे गाड्यांवर होणार आहे
रेल्वेच्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी भुसावळ विभागातून जाणार्‍या रेल्वे गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावतील. यात 11078 जम्मूतावी-पुणे एक्सप्रेस ही गाडी विभागात 2 तास 45 मिनिटे थांबविली जाणार आहे. 12780 हजरत निजामुद्दीन वास्को दि गामा एक्सप्रेस ही गाडी एक तास 30 मिनिटे थांबणार आहे.

11410 निजामाबाद – पुणे एक्सप्रेस ही गाडी विभागात 1 तास थांबविणार आहे, 12104 लखनौ – पुणे एक्सप्रेस ही गाडी 1 तास थांबविली जाणार आहे. यामुळे गाडीतील प्रवाशांचे हाल होणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्याच्या गाड्या नियोजीत स्थानकावरून सुटण्याच्या वेळेत सुध्दा बदल केला आहे. यात
12627 बेंगलोर – नवी दिल्ली एक्सप्रेस ही गाडी 26 नोव्हेबर रोजी बेंगलोर वरून नियोजित वेळेत रात्री 7.20 ऐवजी रात्री 11.20 वाजता (4 तास उशिराने) सुटणार आहे. 22685 यशवंतपूर – चंदिगढ एक्सप्रेस ही गाडी 26 रोजी यशवंतपूर वरून दुपारी 2.45 ऐवजी संध्याकाळी 6.15 वाजता (3.30 तास उशिराने) सुटणार आहे. 11025 पुणे – अमरावती एक्सप्रेस ही गाडी 27 रोजी पुणे येथून सकाळी 11.05 ऐवजी दुपारी 2.05 वाजता (03 तास उशिराने) सुटणार आहे, दुहेरीकरणाच्या महत्त्वाच्या कामांसाठी हा विशेष ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन सुधारित वेळापत्रकानुसार बदलावे आणि झालेल्या गैरसोयीबद्दल सहकार्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.