वहुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार जनजागृती कार्यक्रम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्साही आणि सर्वसमावेशक मार्गाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वीप अंतर्गत भुसावळमध्ये व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे आणि याकरिता नागरिकांकडून तसेच विविध संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक 26 /11 /25 रोजी संविधान दिनानिमित्त श्री गाडगेबाबा महाविद्यालय भुसावळ येथे संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमात एन एस एस स्वयंसेवकांच्या विविध बुथवर नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील साहेब आणि नोडल अधिकारी स्विप तथा गटशिक्षणाधिकारी श्री किशोर वायकोळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सहायक नोडल अधिकारी श्री वसंत खरे आणि श्री राहुल पाटील सर यांनी यावेळी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे चला करू मतदान ही संकल्पना घेऊन सु.ग.टेमाणी कन्या विद्यालयात श्री राहुल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकरिता चुनावी पाठशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशाप्रकारे काम करते याचा प्रत्यक्ष अनुभव देऊन मा. प्राचार्या आडवाणी मॅडम कु अर्चना शर्मा आणि प्रा कैलास काळे यांनी विद्यार्थ्यीनींना मतदान जनजागृती करण्याचे आवाहन केले. आज इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय साकेगाव या ठिकाणी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक कुमारी हेमांगी कुंभार आणि द्वितीय क्रमांक कुमारी मयुरी पाटील यांनी अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन स्विप द्वारे करण्यात येत आहे.




