प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या सूचना: शहरात एकूण 191 मतदान केंद्र ,पैकी चार मॉडेल पोलिंग स्टेशन :

भुसावळ (प्रतिनिधी). भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ रोजी प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठक उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .

तापी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी यांना नेमून देण्यात आलेली कामे अचूक व वेळेवर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यात वमतदान केंद्रावरील पाणी,दिवाबत्ती, फर्निचर व इतर आवश्यक सुविधा पुरविणेबाबत विविध सूचना देण्यात आल्या . तसेच शहरात एकूण 191 मतदान केंद्र आहेत पैकी चार मॉडेल पोलिंग स्टेशन असणार आहेत त्यामध्ये पी. के. कोटेचा महिला विद्यालय – मॉडेल पोलीस स्टेशन के नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तापी नगर – वुमेन ऑपरेटेड पोलिंग स्टेशन , एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल शारदा नगर – युथ ऑपरेटेड पोलीस स्टेशन , महाराणा प्रताप विद्यालय – दिव्याग पोलिंग स्टेशन आदी विविध माहितीचा आढावा बैठकीत समावेश होता . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटीलआणि नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते .