टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना; रोजगारनिर्मिती वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ शहरातील टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना देऊन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाहाटा कॉलेजजवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या मागणीवर हा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार राजू मामा भोळे, आमदार अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तसेच भुसावळच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रांतील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सत्ता एकहाती दिल्यासच विकासाचा मार्ग सुकर होतो, असे सांगत महिलांना प्राधान्य देण्याच्या भाजपच्या धोरणाचा उल्लेख केला. अनेक नगरपालिकांमध्ये महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय याच हेतूने घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचे सांगत प्रचारात पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, ज्या ठिकाणी युती आहे तिथे युतीसाठी आणि जिथे नाही तिथे भाजपसाठी काम करा. नगरपालिका क्षेत्रात महिलांचे प्रश्न अधिक असल्यानेच महिलांना उमेदवारी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील विकासकामांवर आश्वासनांची मालिका
सावकारे यांनी सांगितले की, भुसावळचा पाणी प्रश्न १८ महिन्यांत मार्गी लागेल आणि प्रत्येक घरात २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध होईल. अमृत योजनेचे काम वेगाने सुरू असून बस स्टँड जागेचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. शहरातील ७० टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहर हद्दवाढ प्रस्तावही विचाराधीन असून मंजुरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुंडगिरी आटोक्यात — गिरीश महाजन
कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळातील गुंडगिरी पूर्णपणे आटोक्यात आल्याचा दावा करीत.उत्तर महाराष्ट्रातून विरोधकांचा सुपडा साफ होणार – मंत्री ना. गिरीश महाजन भुसावळ लोकसभा आणि विधानसभा प्रमाणे नगरपालिका निवडणूकीत विरोधकांचा सुपडा साफ होणार असून प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतीवर भाजपाच झेंडा फडकणार असे प्रतिपादन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले विरोधकांवर टीका करताना, “रोहित पवार हे बाबांच्या खांद्यावर मोठे झाले; पोस्टल बॅलेटवरून निवडून आले,” असा आरोप त्यांनी केला. यासोबतच “जिल्ह्यात एक तरी नगराध्यक्ष जिंकून दाखवा,” असे आव्हान देत जिल्ह्यातील सर्वच जागांवर भाजप विजय मिळवेल, असा विश्वासहि त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुसावळकरांचा पाण्यासाठीचा वनवास संपणार असून वर्षभरात 24 तास पाणी अमृत योजनेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे सांगून टेक्स्टाईल उद्योगांना चालना, रोजगारनिर्मिती, पिण्याच्या पाण्याचा स्थायी तोडगा, रस्ते विकास, बस स्टँड, हद्दवाढ यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर जलद तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तसेच भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण एससी प्रवर्गाचे निघाल्यानंतर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला तिकीट दिल्याचा आरोप झाला मात्र मुळात मंत्री संजय सावकारे यांनी पत्नीला तिकीट मिळावे म्हणून मागणी केली नाही तर पक्षाने भुसावळात सर्वे केला व त्यात पहिल्या क्रमांकावर रजनी सावकारे यांचे नाव आल्याने त्यांना तिकीट देण्याचा पक्षाचा असून मंत्री संजय सावकारे यांचा संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी येथे स्पष्ट केले.देश व राज्याप्रमाणे पालिकेतही हवे मोदीजींच्या द़ृष्टीचे व्हिजन
मुख्यमंत्री म्हणाले की, शहरे कशी बदलली पाहिजे याची आमच्याकडे ब्लू प्रिंट आहे त्यामुळे सकारात्मक माध्यमातून आम्ही मत मागणार असून विरोधकांवर कुठलीही टीका-टीप्पणी आम्ही करणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू आहे त्यामुळे विकासाची कास धरलेले सरकार केंद्रासह राज्यात पहायला मिळत आहे. आपल्याला त्याच विचारांचे सरकार नगरपालिकेतही आणायचे आहे व मोदीजींच्या दृष्टी व व्हीजनद्वारे आपल्याला काम करायचे आहे, असेही ते म्हणाले
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांकडे दुर्लक्ष झाल्याने ती बकाल झाली आहे. या शहरांमध्ये अन्न, वस्त्र व निवार्‍याची, रोजगाराची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी लाखो कोटी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी चार वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात भुयारी गटारी होतील, सांडपाणी रस्त्यावर वा कुठेही दिसणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत योजनांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करीत असल्याचेही सांगितले.भुसावळसाठी मंजूर असलेल्या अमृत योजना टप्पा एकचे काम कंत्राटदार करीत नसल्याने त्यास ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून अमृत टप्पा दोनच्या कामाला गती आली आहे. लवकरच कामे पूर्ण होतील व वर्षभरात भुसावळकरांना २४ तास पाणी मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला . भुसावळातील एमआयडीसी टेक्सटाईल पार्क आणण्याची मागणी मंत्री संजय सावकारे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाषणातून आश्वास्त करीत पुढील महिन्यात डावोसमध्ये जात असल्याने एक तरी उद्योग भुसावसाठी आणणार असल्याची ग्वाही दिली. दीपनगरात 800 मेगावॅटचा प्रकल्प करायला हवा, अशी मागणी सावकारे यांनी केली असून त्यादृष्टीनेही आम्ही प्रयत्न करू शिवाय मंत्री सावकारे यांच्या प्रत्येक मागण्या पूर्णच केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.लाडकी बहिण योजना बंद होणार नाही
सरकारला २३ नोव्हेंबर रोजी येवून एक वर्ष झाले मात्र निवडून आल्यानंतर लाडकी बहिण योजना बंद होईल, अशी भीती घालण्यात आली मात्र जो पर्यंत लाडक्या बहिणींचा हा देवाभाऊ आहे तो पर्यंत योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भुसावळात १४७ कोटीतून स्टेशन निर्मिती करण्यात येत असून हे सरकार गरीबांसाठी, महिलांसाठी काम करणारे सरकार असल्याचे ते म्हणाले.तुम्ही भाजपाला साथ द्या, पाच वर्ष आम्ही जवाबदारी घेवू, असेही त्यांनी सांगत महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे सांगितले.

भुसावळातील हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावणार ! भाजपा उमेदवार रजनी सावकारे – भुसावळसाठी अमृत योजना मंजूर झाल्यानंतरचे श्रेय अनेकांनी लाटले मात्र ती योजना पूर्णत्वास आणण्यासाठी मंत्री संजय सावकारे प्रयत्न करीत आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळात प्रशासकीय काळात अत्यंत चांगले काम झाले असून 70 टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत व यासाठी मंत्री संजय सावकारे यांचा पाठपुरावा मोलाचा असल्याचे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे येथे म्हणाल्या. नागरिकांनी संधी दिल्यास शहराच्या हद्दवाढीचा तसेच नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी लावू शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी किमान दिड वर्षांचा अवधी लागणार असून तो पर्यंत रोटेशन पद्धत्तीने पाणीपुरवठा होणार असल्याचे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी सांगितले. भुसावळातील सांडपाण्यासाठी भुयारी गटारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून आगामी काळात तोही मंजूर होवून ड्रेनेज व स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल व या माध्यमातून चांगले आरोग्य अबाधीत राहील शिवाय भुसावळात क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे, आम्ही नाट्य व कला प्रेमी असल्याने शहरात नाट्यगृह व्हावे ही शहरवासीयांची इच्छा असलीतरी शहरात जागा नसल्याची अडचण आहे मात्र त्यावरही तोडगा काढू, असे त्यांनी सांगत नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास भुसावळ शहरातील हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपला मानस असेल, असे त्यांनी सांगितले. राजकारण आपला पिंड नसलातरी समाजकारणावर आपला अधिक भर असून सामाजिक उपक्रम घेत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चौधरी व धनंजय चौधरी यांनी केले.

तर. शामलताई झांबरे — नगराध्यक्ष उमेदवार (वरणगाव) “वरणगावचा विकास फक्त भाजपमुळे झाला; पुन्हा संधी द्या.”रोहिणी उमेश फेगडे — नगराध्यक्ष उमेदवार (यावल)“यावलकरांचा विश्वास सार्थ सिद्ध करणार.” तसेच चोपडा, फैजपूर, सावदा, रावेर, मुक्ताईनगर, शेंदुर्णी, नसिराबाद, पाचोरा, भडगांव, एरंडोल आणि चाळीसगाव येथील उमेदवारांची उपस्थितीही नोंदवली गेली . यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सभेला अंदाजे १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती होती.