पालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप प्रक्रिया ;

भुसावळ ( प्रतिनिधी;) –
नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप होणार आहे निवडणूक अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होण्यासाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह वाटपाची प्राथमिकता अशी ठरवण्यात आली आहे –
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना प्रथम प्राधान्य: प्रथम ६ राष्ट्रीय पक्ष, राज्यातील ५ पक्ष आणि इतर राज्यातील सर्व नोंदणीकृत राज्य पक्षांना चिन्ह दिले जाईल.
नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्ष: नंतर या पक्षांच्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. जर एकाच चिन्हासाठी एकाहून अधिक पक्षांनी अर्ज केला असेल, तर ड्रॉ करा द्वारे चिन्ह ठरवले जाईल.तात्पुरते आरक्षित चिन्ह: कलम १७ अंतर्गत तात्पुरते चिन्ह आरक्षित असेल, तर ते संबंधित पक्षाच्या सर्व उमेदवारांना दिले जाईल.उमेदवारांच्या पसंतीनुसार वाटप: उमेदवारांच्या प्रथम पसंतीच्या चिन्हावरून चिन्ह वाटप केले जाईल. जर एकच चिन्ह एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मागितले असेल, तर ड्रॉ द्वारे निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी आणि तिसरी पसंती तपासून चिन्ह वाटप केले जाईल.शेवटचे चिन्ह (Free Symbol): सर्व पसंती तपासल्या नंतरही काही उमेदवार शिल्लक असल्यास, ते आर ओ कडून उपलब्ध Free Symbol मिळवू शकतात.

जर उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नसेल, तर आर ओ के आणि स्वतः चिन्ह वाटप करतील.सदस्य पदासाठीही हीच प्रक्रिया लागू असेल. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी दिलेले चिन्ह इतर प्रभागातील उमेदवारांना देता येणार नाही. अपवाद फक्त त्या उमेदवारांसाठी आहे, जे नगराध्यक्ष पदासाठी लढवत असून इतर प्रभागातूनही उमेदवारी दाखल करतात. ही प्रक्रिया नगरपालिकेतील निवडणूक अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि विवादमुक्त करण्यासाठी आखण्यात आली असल्याचे अधिकारी यांनी सांगितले