भुसावळात चंपाषष्टीनिमित्त उद्या यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर :

भुसावळ : चंपाषष्टीनिमित्त बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी नाहाटा कॉलेजजवळील खंडोबा मंदिरात धार्मिक उत्साहाने पूजा-अर्चा पार पडणार आहे. सकाळी पारंपरिक TRTRतळी उचलण्याचा सोहळा संपन्न होईल.

‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सदानंदाच्या जयघोषात भंडारा उधळत भाविक आनंद व्यक्त करतील. चंपाषष्टीच्या मुहूर्तावर खंडोबा देवस्थान परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जाईल. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .