माणसाने धर्माचा प्रचार प्रसार केला तरच संस्कृती टिकेल – प.पू.स.गु.मयुरदादा महाराज नूतन श्री बदरीनाथ मंदीर निर्माणातर्गत कथा सुरू ;

जळगाव (प्रतिनिधी ) – माणसाने धर्माचा प्रचार प्रसार केला तरच संस्कृती टिकेल असा उपदेश प.पू.स.गु.मयुरदादा महाराज यांनी निरूपण करतांना दिला . येथील नूतन श्री बदरीनाथ मंदीर जळगावच्या निर्माणाअंतर्गत दिव्य १०८ कथा संकल्पात संस्थानचे गादीपती प.पू.स.गु.मयुरदादा महाराजश्री यांच्या विवीध पुराणांच्या कथा सुरू आहे .

प्रभात कॉलनी येथे सुरू असलेली कथा क्रमांक ४ ब्रम्हवैवर्त पुराण कथा यात निरूपण करताना महाराजांनी सांगितले की गणपतिच्या पोटावर नाग आहे व वाहन मुषक आहे तरी दोन वेगवेगळ्या स्वभावाचे प्राणी परमेश्वराजवळ न भांडताना राहू शकतात तर माणसाने एकत्र येऊन का बर धर्माचे कार्य करू नये असे निरुपण करताना सांगितले. तसेच माणसाने आपापसातील वाद तंटा कलह भेदभाऊ मिटवून एकत्र येऊन धर्माचे कार्य करावे. प्रेमाने सलोख्याने शांततेने राहावे. त्यामुळे कार्य सफल होतात असेही यावेळी मयूरदादा महाराज यांनी सांगून विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला .प्रसंगी कथेत सजीव देखावा सादर करण्यात आला
यावेळेस परिसरातील भाविकभक्त मोठ्या संख्याने उपस्थित होते