भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत प्रथमतः नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार पदाधिकारी बनण्यासाठी निवडणुकीस उभे आहे पदाधिकारी ज्या शासकीय योजना असतात त्यांचा पुरेपूर उपयोग आपल्या मतदारसंघासाठी करू शकता तसेच विविध माध्यमातून जनजागृती करत लोक सहभागातून सुद्धा अनेक कामे करू शकता सद्यस्थितीत आपल्या देशात प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊन अशुद्ध हवेचे खूप मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. आपली राजधानी दिल्ली सारख्या ठिकाणी लहान मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. यावरून आपण समजू शकतो की किती मोठ्या lप्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे त्यामुळे पर्यटनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आपल्या महाराष्ट्रातही प्रदूषणामुळे आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे सर्व दूर अनेक ठिकाणी वादळ झाले कधी न होणारी ढगफुटी जवळजवळ सर्वच ठिकाणी झाली अनेक गुरे ढोरे वाहून गेली शेतातील माती वाहून जात जमीन शेती योग्य राहिली नाही त्यावरूनही आपल्या येथेही मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे आपल्या सहित सर्व निसर्गनिर्मित सजीवांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेले आहे बहुसंख्य जणांना मधुमेह चा त्रास होत आहे अनेक जणांना किडनीचा त्रास होऊन डायलिसिस करावा लागत आहे तसेच प्रोस्टेट ग्रंथीचा किडनीतील व पित्ताशयातील खड्यांचा तसेच कॅन्सर व पार्किन्सन्सचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे बहुतेक महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होऊन अशक्तपणा निर्माण झालेला आहे अशा अनेक अडचणींचा सामना बहुसंख्य जनतेला तसेच प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची प्रदूषण मुक्त स्वच्छ हवेची नितांत आवश्यकता आहे जीवन निरोगी आहे तर सर्व काही आहे नाहीतर सर्व निरर्थक आहे म्हणजे आज रोजी प्रत्येक मतदाराला सर्वात महत्त्वाची गरज शुद्ध हवेची आहे तरी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांनी प्रदूषण मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीं तसेच प्रदूषण निर्माण होणाऱ्या सर्व घटकांना विरोध करण्याची जनजागृती करत आपला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवून प्रचार करत आपले खरे कर्तव्य म्हणून निसर्गास म्हणजे आपल्या मातृभूमीस तसेच आपल्या देशासाठी सहकार्य आपल्या देशावर असलेल्या प्रदूषणाचा शेरा पुसून सर्व दूर प्रदूषण मुक्त देश म्हणून ओळख निर्माण करत आवश्यक असलेल्या पर्यटन वाढीसाठी उद्योग धंद्यासाठी मदत होईल .

डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान


