भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेचा शिंदे गट सोबत गेला असलातरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी चूल मांडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी अर्शिया मुक्तार अन्सारी यांना उमेदवारी दिली असल्याची व नगरसेवक पदासाठी 36 जागांवर उमेदवार दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश कालिदास नेमाडे यांनी संपर्क कार्यालयात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भुसावळसह रावेर लोकसभेत राष्ट्रवादी स्वबळावर
उमेश नेमाडे म्हणाले की, भुसावळसह नव्हे तर दहा पैकी नऊ पालिकांवर आम्ही स्वबळावर लढत असून केवळ चोपड्यावर आम्ही युती केली आहे. पक्षाला पोषक वातावरण असल्याने आम्ही स्वबळावर लढण्याच निर्णय घेतला आहे. भुसावळ शहरातील कार्यकर्त्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह असल्याने 36 जागांवर आम्ही उमेदवार दिले असून नगराध्यक्ष पदासाठी अर्शिया मुक्तार अन्सारी या उच्चशिक्षीत उमेदवाराला आम्ही संधी दिली आ
हाजी आशिक खान शेर खान, विवेक ठाकरे, शरीफ ठेकेदार, हाजी नईम पहेलवान आदींची उपस्थिती होती.


