भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा तापण्यास सुरूवात होताच विविध पक्षांतर्फे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील भुसावळसह तालुक्यात ताकदीने निवडणुकीत उतरणार असून निवडणुकीतील व्युहरचना व रणनिती ठरवण्यासाठी रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मनसे मध्यवर्ती कार्यालय, श्री गजानन महाराज मंदिराजवळ, नाहटा कॉलेज, जामनेर रोड, भुसावळ येथे बैठक बोलावण्यात आली आहे.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अॅड.जयप्रकाश बाविस्कर असतील. आगामी स्थानिक राजकीय घडामोडी व संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.
बैठकीसाठी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच भुसावळ नगरपालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर लढण्याची इच्छा असलेले सर्व इच्छुक कार्यकर्ते यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक यांनी ले आहे.
मनसेच्या भुसावळ विभागातील ही बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. मनसेच्या भुसावळ विभागातील ही बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अॅड.जयप्रकाश बाविस्कर असतील. आगामी स्थानिक राजकीय घडामोडी व संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.
बैठकीसाठी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच भुसावळ नगरपालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर लढण्याची इच्छा असलेले सर्व इच्छुक कार्यकर्ते यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक यांनी ले आहे. मनसेच्या भुसावळ विभागातील ही बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.


