जळगांव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगीरी ; जळगाव शहरातील श्रीराम रथ उत्सवामध्ये महिलांचे सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या अटटल महिला गुन्हेगार जेरबंद ;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील श्रीराम रथउत्सवाचा कार्यक्रम चालू असतांना गर्दीचा फायदा घेऊन रथ पाहण्यासाठी आलेल्या काहि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविणाऱ्या संशयीत महिला आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

संध्याकाळी 6 ते 8. वा च्या दरम्यान जळगाव हशरातील दाणाबाजार परीसरातील अन्नदाता हनुमान मंदोराच्या जवळ रथ आल्याने, रथ पाहण्यासाठी सदर ठिकाणी महिला व आबालवृद्धांची अतिपय गर्दी झालेली होती. सदर गर्दीचा फायदा घेत यातील काही महिलांच्या अंगावरील सुमारे 77500/- रुपायाचे सोन्याचे मंगळसुत्रातील वाटया व मंनी महिला आरोपीतांनी तोडल्या बाबत काही महिलांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

या महिलांच्या तक्रारी प्राप्त होताच .पोलीस अधोक्षक माहेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक . अशोक नखाते , उप विभागीय पोलीस अधिकारी . नितीन गणापूरे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या दोन टीम तयार करुन त्यांनी श्रीराम रथउत्सवाचा कार्यक्रमामध्ये दाणाबाजार येथे रवाना केलं.

महिला आरोपीतांनी चोरी केल्याने त्यांचेविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 377/2025 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई …

गुन्हे शोध पथकातील सफी/सुनिल पाटील, पोहेकों/ नंदलाल दशरथ पाटील, पोहेको/विरेंद्र भगवान शिंदे, पोहको भगवान तुकाराम पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकों/सतिश पाटील, पोहेकों योगेश पाटील, पोकों भगवान रामराव मोरे, पांकों अमोल अशोक ठाकुर, पोकों/प्रणय सुरेश पवार, मपोको हर्षदा सोनवणे, मपोकों जयश्री मराठे, मपोकों मोनाली राजपुत यांनी काही संशयीत महिलांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन खालील वर्णनाचे सोन्याचे मंगळसुत्राच्या वाट्या व मनी मिळून आले. 1)12000/- एक सोन्याच्या मंगळसुत्राच्या 02 वाट्या त्यांचे वजन 1.870 ग्रॅम जुवाकिंअं

2) 4000/- रु कि चे 04नग सोन्याचे मनी वजन 0.680 ग्रॅम जुवाकिंअं

3) 9000/- रु कि चे 01 नग मंगळसुत्रातीत सोन्याची वाटी वजन 1.460 ग्रॅम जुवाकिंअं.

4)9000/- रु किंचे 01 नग मंगळसुत्रातीत मध्यम आकाराची सोन्याची वाटी वजन 1.460 ग्रॅम जुवाकिंअं,

5) 6000/- रु कि चे 01 नग मंगळसुत्रातीत लहान आकाराची सोन्याची वाटी वजन 0.950 ग्रॅम जुवाकिंअं.

40,000/-रु एकूण या प्रमाणे मुददेमाल ताब्यातु घेवुन गुन्हाकामी जप्त करण्यात आला आहे.