भुसावळ (प्रतिनिधी ) –
३१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील धावपटू, सायकलपटू व विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदविला. शिवाय शहरातील पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती.
प्रारंभी कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत डॉ निलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप व्यायाम घेण्यात आला. त्यांनतर ठीक ६.३० वाजता बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उद्धव डमाळे, रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श उमेश महाले, भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा प्रविण फालक यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडी दाखवून रनला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर सर्व धावपटू अतिशय शिस्तीत एकत्र धावत व भारत माता कि जय, वंदे मातरम, सरदार वल्लभभाई पटेल कि जय अशा देशभक्तीपर घोषणा देत शहरातील जळगाव रोडवरील वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ पोहचले. त्याठिकाणी सर्वप्रथम सर्वांनी वंदन करून प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यांनतर पुन्हा धावायला सुरूवात करून सर्व सहभागी मैदानावर पोहचले.याप्रसंगी शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे सर्व धावपटू सुरक्षितपणे धावत होते. शिवाय या उपक्रमाचे शहरातील इतर नागरिक, प्रवासी कुतूहलाने बघतांना कौतुक करीत होते.
मैदानावर परतल्यावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे सर्व अथितीचें स्वागत करण्यात आले व रन फॉर युनिटी निमित्त मार्गदर्शपर कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ व पोलीस निरीक्षक श्री उद्धव डमाळे यांनी मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनतर सहा. पोलीस निरीक्षक श्री उमेश महाले यांच्यासोबत सर्वांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.
याप्रसंगी संजय भदाणे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रशांत चव्हाण, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दीपक शेवरे, विनोद विटकर, स्वाती फालक, मंगला पाटील, गणसिंग पाटील, प्रविण वारके, सुयश न्याती, प्रशांत चौधरी, संजय तिवारी, सारंग चौधरी, राजेंद्र ठाकूर, मंगेश चंदन यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, प्रशांत वंजारी, विलास पाटील, नीलांबरी शिंदे यांचे सहकार्य लाभले.




