भुसावळात गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन आणि डे नाईट हॉस्पिटलतर्फे 2 नोव्हेंबर रोजी फक्त पुरुषांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग जीएनआरएफ (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) आणि डे नाईट हॉस्पिटल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त पुरुषांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डोळे, दात, ईसीजी, रक्तातील साखर, बीपी, ऑक्सिजन तसेच इतर आजारांची मोफत तपासणी करण्यात येईल. गरजू रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जातील. दिनांक: 2 नोव्हेंबर 2025, रविवार दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत
एम. आया तेली इंग्लिश मीडियम स्कूल, खडका रोड, मोहम्मद अली रोड, भुसावळ (जि. जळगाव) येथे आयोजित शिबिराकरीता संपर्क:
91561 11786, 81492 15259, 98902 26331 यावर संपर्क साधावा
नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जीएनआरएफ जळगाव जिल्हा निरीक्षक रफीक रोशन कादरी यांनी केले आहे