भुसावळ (प्रतिनिधी ) – किन्ही तालुका भुसावळ येथे किन्ही ग्रामपंचायतच्या वास्तूचे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आज रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील हे होत प्रसंगी सरपंच नीलम सोनवणे, उपसरपंच जयंत पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील ,तहसीलदार निता लबडे मॅडम, गटविकास अधिकारी डी जी जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ चेअरमन अनिल वारके, भुसावळ तालुका भाजप अध्यक्ष गोलू पाटील , माजी सभापती भुसावळ पंचायत समिती राजेंद्र चौधरी यांची उपस्थिती होती. प्रसंगी तलाठी कार्यालय, ग्रामसचिवालय ,छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, अभ्यासिका या इमारतींचे उद्घाटन झाले.

किन्ही गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन मनोगतात मा सावकारे यांनी करीत किन्ही गावातील ग्रामपंचायतीच्या कार्याच्या एकजुटीचे देखील कौतुक मंत्री संजयजी सावकारे यांनी केले .कार्यक्रम प्रसंगी भुसावळ तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पंचक्रोशी मधील अनेक नागरिकांना श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या लाभाचे प्रमाणपत्र वितरण झाले. ग्रामपंचायत घरपट्टी पूर्णपणे देणाऱ्या नागरिकांना डस्टबिन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच नीलम सोनवणे उपसरपंच जयंत पाटील ,ग्रामसेवक सी एच वाघमारे ,तलाठी प्रमोद ठोसर या सर्वांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमासाठी किन्ही गावातील ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सचिन सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल सुरवाडे यांनी केले.



