किमया बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेने दिवाळी केली गोड


भुसावळ (प्रतिनिधी) – दिपावली पर्वा निमित्ताने किमया बहुउद्देशीय संस्था भुसावळ च्या माध्यमातून वराडसिम व वाघुर कॉलनी औरयेथिल भिल्ल व भिलाला वस्तीवर संस्थेने दिवाळी फराळ व नविन कपडे भेट म्हणून दिली संस्था नेहमीच असे समाजपयोगी उपक्रम राबवित असल्याचे संस्था अध्यक्षा ॲड.जास्वंदी निलेश भंडारी यांनी सांगितले तसेच वस्तीवरील लोकांचे समस्या जाणून घेवून सोडविण्यासाठी मदत करण्याचेही ग्वाही दिली.

सदर उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव ॲड निलेश भंडारी, कोषाध्यक्ष ॲड जयश्री देशमुख, सदस्य ॲड. मंजुषा कुलकर्णी, पत्रकार उज्वला बागुल, श्री दयाघन राणे सर , किमया भंडारी यांनी प्रयत्न केले