भुसावळ (प्रतिनिधी ) – भारत विकास परिषद,शाखा भुसावळ तर्फे भुसावळ तालुक्यात मांडवेदिगर परिसरातील “पावरी पाडा” या ठिकाणी 50 गोरगरीब परिवारांना (शेव,चिवडा,चकली लाडू,शंकरपाळे.) प्रत्येक परिवारास एक किलो.फराळाचे एक पाकीट आणि 5 पणत्या-वाती,कपडे,साड्या देऊन गरिबांची दिवाळी गोड करण्यात आली.


प्रत्येक परिवाराच्या लहान-मोठ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता.सदर प्रसंगी अध्यक्ष सतिश खडायते,सचिव हरीष कोल्हे,गौरव हिंगवे,योगेश मांडे,विलास फालक,रमाकांत भालेराव,जयश्री चौधरी,श्रीकांत जोशी,भुषण वैद्य,सुजित भोळे,निखिल वायकोळे,प्रदिप फिरके,अभय विसपुते,विलास जावळे. मांडवेदिगरचे पोलिसपाटील रविंद्र पवार.आदी उपस्थित होते..



