जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाने बाजी मारली ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – क्रिडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांचे संयुक्त माने आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव येथे राष्ट्रीय महाविद्यालयात संपन्न झाल्या.

या जिल्हास्तरीय शालेय शासकीय बास्केटबॉल स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाने अंतिम सामन्यात जामनेर येथील संघाला 23 गुणांच्या फरकाने नमवीत विजय मिळविला. व नाशिक विभागीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे.

विजयी संघाचे व मार्गदर्शक क्रिडा शिक्षक श्री.आशिष चौधरी , श्री.लक्ष्मीकांत नेमाडे , श्री.सुनिल चौधरी सर व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे शाळासमिती अध्यक्ष श्री.चंद्रकांतजी हरी बढे सर , संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई पाटील मॅडम, सर्व कार्यकारीणी मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री.सी.जे.तायडे सर सर्व पर्यवेक्षक , शिक्षक शिक्षकेतर वृंद यांचेकडून विजयी संघाचे अभिनंदन व शुभेच्छा .