भुसावळ (प्रतिनिधी ) –
खरेदी करतांना स्वदेशी वस्तुंचीच खरेदी करावी असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले . ते भुसावळ येथील ब्राह्मण संघात आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात बोलत होते
या प्रसंगी संपादित गायक दिनेश जोशी, प्रवीण कुलकर्णी, योगेश साळशिनिगीकर, श्री भोकरडॊळे, सौ मृणाल गाडगीळ, सौ हिंगवे तसेच जयोस्तुते गीत या समूह गान सादर केले .
कार्यक्रमात प्रथम भुसावळ चे लोकप्रिय आमदार व वस्त्रउद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे, यांच्या शुभहस्ते ब्राह्मण संघ कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर तसेच भगवान परशुराम, समर्थ रामदास स्वामी व श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.


यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन श्री महेशभाऊ फालक, नगरसेवक श्री निर्मलभाऊ कोठारी, रेणुका माता मंदिराचे अध्यक्ष श्री भूषणभाऊ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रसंगी श्री संजयभाऊ व सौ रजनीताई सावकारे या उभयंता च्या हस्ते श्री महालक्ष्मीची आरती संपन्न झाली व संघाच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात मा. संजयभाऊ सावकारे यांचा समाजाच्या वतीने ब्राह्मण संघांचे अध्यक्ष गणेश वढवेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच स्वा. सावरकरांचा पुतळा देऊन सत्कार करण्यात आला व ब्राह्मण संघ भुसावळ तर्फे महाराट्रात झालेल्या अतिवृष्टी मुळे संकटात आलेल्या शेतकरी बंधूना मदत म्हणून 11111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधी साठी देण्यात आला.

श्री महेशभाऊ फालक यांचा सत्कार उपाध्यक्ष श्री गजानन जोशी तर निर्मल कोठारी यांचा सत्कार सचिव महेंद्र गोडबोले व भूषण पाटील यांचा सत्कार कोषाधक्ष अमोद टेम्भूर्णीकर यांच्या हस्ते करण्यात आला. सौ रजनीताई सावकारे यांचा सत्कार श्रीमती कल्पना दामले, सौ वैशाली एकलारकर व वनिता मंडळाच्या सौ मृणाल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव महेंद्र गोडबोले यांनी प्रस्तविक केले तर अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी ब्राह्मण संघाच्या उपक्रमाची माहिती दिली. व समाज बांधवाना सहकार्य करण्यासाठी विनम्र आवाहन केले. सत्काराला उत्तर देतांना श्री संजयभाऊ सावकारे यांनी जातीपातीचे राजकारण न करता समस्त हिंदूसमाजाने एकत्र येऊन मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी चळवळीला हातभार लावावा व येत्या दिवाळी उत्सवात स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी असा आग्रह केला.
ब्राह्मण संघ भुसावळ ने शेतकऱ्यांना केलेल्या आर्थिक सहकार्याचे कौतुक केले. तसेच उपस्थित समाजबांधवांच्या आग्रहात्सव गायनच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन एक गीत देखील गाऊन आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज जोशी व अतुल जोशी यांनी केले तर प्रसन्न गंधे, डॉ रमेश जोशी, विजय जोशी,सुनील पाठक,संजय बोचरे, तुषार कुलकर्णी, हेमंत भोकरडॊळे, शंतनु गचके, जयंत जोशी,दिनेश जोशी, कल्पना दामले, वैशाली एकलारकर या सर्व कार्यकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळीदुग्धपान व गरम गरम भजे यांचा आस्वाद घेऊन समाज बांधवानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. व विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्य शिस्तीत, वेळेवर व आनंदात संपन्न झाले .


