जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आगामी सण-उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरणगाव येथे कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार वरणगाव शहरातील तिरंगा चौक येथे एक संशयित व्यक्ती अवैध शस्त्रासह फिरत असल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.
सदर ठिकाणी संशयित इसमास पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५० वर्षे, रा. दर्यापुर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) असे सांगितले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस, एकूण किंमत रु. ५०,५००/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २१३/२०२५, आर्म्स अक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करीत आहेत.
आरोपी संजय चंडेले याच्यावर यापूर्वीही आर्म्स अक्ट अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत
१) गु.र.क्र. ०२/२०२२ (वरणगाव पो.स्टे.)
२) गु.र.क्र. २८/२०२२ (वरणगाव पो.स्टे.)
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पो.उ.नि. शरद बागल, ग्रे.पो.उ.नि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ राहुल वानखेडे व चापोकॉ भारत पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.



