नाहाटा कॉलेजच्यासमोरील बस स्टँडच्या जागेवरील अतिक्रमण हटवा-माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांची मागणी.


भुसावळ(प्रतिनिधी ) – शहरातील नाहाटा कॉलेजच्या समोर बस स्टैंडने टच पॉईंट तयार केला आहे.या सिमेंट च्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे.तेथील लोकांचा गैरवापर होत असल्याने बाजूच्या रहिवाशांना घाणीचा त्रास होत असल्याने हे अतिक्रमण न.पा.व महामंडळाने त्वरीत काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
याबाबतीत त्यांनी म्हटले आहे कि,सदरहु जागेवर महामंडळाने लाखो रुपये खर्च करून सिमेंट चा मोठा ओटा टच पॉईंट साठी तयार केला आहे.वापर सुरू नसल्याने या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे.तेथील लोकांचा सांडपाणी गैरवापर होत असल्याने बाजूच्या रहिवाशांना घाणीचा त्रास होत आहे.त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत काढून तेथे बंदिस्त कंपाऊंड तयार करावे म्हणजे नेहमी साठी सुरक्षितता होईल.असेही त्यांनी म्हटले आहे.