भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळात इनरव्हील क्लब च्या पुढाकाराने स्वच्छता आणि जनजागृती अभियान राबवले गेले. क्लबच्या सेक्रेटरी सविता शुक्ला यांनी संतोषी माता हॉलच्या मागील परिसर तसेच देना नगर सह या भागातील विविध ठिकाणी “उघड्यावर कचरा टाकू नका” असा संदेश देणारा बोर्ड भुसावळ बसवला.

या प्रभागात उघड्यावर कचरा टाकल्यामुळे परिसर आणि प्रभाग अतिशय अस्वच्छ दिसत होता. त्यामुळे इनरव्हील क्लबने हा उपक्रम हाती घेतला आणि “स्वच्छ भारत, समृद्ध भारत, संपन्न भारत” असे जनजागृती नारे यावेळी देण्यात आले.
या संदेश बोर्डाचे उद्घाटन भाजपचे ओबीसी मोर्चाचे सचिव श्री. शिशिर जावळे यांच्या व माजी नगरसेवक तथा भाजपाचे शहर अध्यक्ष किरण कोलते यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी इतर मान्यवर म्हणून जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार दिनकर जावळे सर, जगन्नाथ पाटील, सुरेश चौधरी, उपस्थित होते. तसेच या ठिकाणी या परिसरातील पुरुष महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
क्लबच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रेसिडेंट सुनंदा भारुडे, सेक्रेटरी सविता शुक्ला, पीपी कमल सचदेव, देव स्वाती, देव रुचिका शर्मा यांचा समावेश होता.स्वच्छता आणि सार्वजनिक जागा संवर्धनाच्या महत्त्वाची जाणीव व्यक्त केली.
यावेळी उपस्थित नागरिक आणि क्लब तर्फे सदर प्रभागांमध्ये घंटा गड्यांची तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
अशा सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता आणि सार्वजनिक जागा संवर्धनाच्या महत्त्वाची जाणीव व्यक्त केली.नागरिकांमध्ये स्वच्छता संदर्भातील जनजागृती वाढविण्याचा उद्देश साधला गेला आणि येथील परिसर स्वच्छ ठेवण्याची सजगता वाढण्याची अपेक्षा सुद्धा यावेळी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव यांची तर्फे व्यक्त केली गेली.


