इतर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये होणारे घुसखोरी त्वरित थांबवावी अन्यथा आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार व लढा देणार- या अनुषंगाने आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे व प्रदेश अध्यक्ष सुनील काळे व महाराष्ट्र महीला उपाध्यक्ष सौ भुराबाई रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 24. 09. 2025 रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना आदिवासी पारधी महासंघ जिल्हा जळगाव शाखेतर्फे निवेदन देण्यात आले

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशचंद्र भगवंत चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्री रोहिदास शहादू चव्हाण, भुसावळ तालुका अध्यक्ष श्री सुनील राजमल पारधी, पंचायत समिती सदस्य अलकाताई पारधी सुनीता राजाराम पारधी, छाया पारधी, रंजना पारधी, योगिता पारधी, राजश्री पारधी, संगीता एकनाथ पारधी, सुनंदा मावळे, उषाबाई पारधी, सोनाबाई पारधी,जिजाबाई पारधी, प्रभा रमेश पारधी, कांताबाई शांताराम पारधी, इंद्रावणी विजय पारधी त्नाबाई पारधी, पूजा रवी पारधी, सुलोचना संतोष पारधी, समाधान पारधी, योगेश राजू पारधी व इतर अनेक समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.



