भुसावळात ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये श्रीगणेश स्थापना:


भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाच दिवसीय गणपतीची स्थापना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत करण्यात आली. रोज नित्य नियमाने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकां मार्फत आरती करून प्रसाद वाटप करण्यात येतो. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सिबीएसई स्कूलमध्ये गणपतीची स्थापना प्रसंगी उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर व शिक्षक वर्ग.