बियाणी चेंबर्स मध्ये श्री गणपतीची स्थापना ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी चेंबर्स मध्ये गणपतीची स्थापना उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांचे सुपुत्र व सुन यांच्या हस्ते करण्यात आली. रोनक बियाणी व आयुषी बियाणी यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन करून आरती व प्रसाद यावेळी देण्यात आला. प्रसंगी उद्योजक मनोज बियाणी,बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी,विनोद बियाणी,पियुष बियाणी,बियाणी चेंबरचे मॅनेजर गोपाल ठाकूर राजू मोरे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील बियाणी चेंबर्स मध्ये गणपतीचे स्थापना प्रसंगी पूजन करताना रोनक बियाणी,आयुषी बियाणी,मनोज बियाणी,विनोद बियाणी,डॉ.संगीता बियाणी,पियुष बियाणी,गोपाल ठाकूर आदी.