श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे श्री अग्रसेन जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथे भगवान श्री अग्रसेन
महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे रविवारी  जामनेर रोड वरील पांडूरंग टॉकीज जवळील अग्रसेन चौकातील प्रतिमेला पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी देवाच्या जयजयकार करण्यात आला व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून सवाांना प्रसाद वाटण्यात आला,नंतर श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात ही फुलांच्या पाकळयांची पुष्यवृत्ती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेकडो बंधू-भगीनी उपस्थीत होते, यावेळी उद्योगपती
मिलींद अग्रवाल,कर सल्लागार देवेंद्र अग्रवाल,जयप्रकाश अग्रवाल,मोंटू अग्रवाल,बद्रीनारायण अग्रवाल,संजय
अग्रवाल,सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेश अग्रवाल,राजेंद्र अग्रवाल,बिणा अग्रवाल,नेहा अग्रवाल,डॉ.रिया अग्रवाल या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार व स्वागत राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व सहकारी यांच्या तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जे आर शर्मा यांनी तर आभार संजय अग्रवाल यांनी मानले.

फोटो कॅप्शन - श्री राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे श्री अग्रसेन जयंती निमीत्त उपस्थित सदस्य.