प्रभाग 24 मधीलआनंद नगरचा मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करा-शिशिर जावळे यांची मागणी :श्रीगणेश आगमनाचा आणि विसर्जनाचा मार्ग खडतर:

भुसावळ (प्रतिनिधी ) – गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वच गणेश मंडळांमध्ये व घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र,भुसावळ शहरातील प्रभाग कमांक 24 मधील आनंद नगर सुराणा बिल्डिंग ते भिरुड हॉस्पिटल हा मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी तर रस्त्याची चाळण झालेली आहे.भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. हा रस्ता तयार केल्यानंतर काही महिन्यांत परत खराब झालेला आहे . या परिसरामध्ये चार ते पाच मुख्य प्रसिद्ध गणेश मंडळांसह अंतर्गत परिसरातील गणेश मंडळ आहेत त्यामुळे या परिसरामध्ये भुसावळ सह जिल्ह्यातून गणेश भक्त येथील मुख्य मंडळांमध्ये विविध देखावे आरास बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात . या परिसरात मोठे दवाखाने सुद्धा आहेत यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक आणि रहदारी वाढते त्यामुळे तसेच या विविध गणेश मंडळांच्या गणेशाच्या आगमनात आणि विसर्जनात खड्यांचे विघ्न येणार असेच चित्र सध्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर रस्तातत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी आणि तक्रार भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सहमुख्याधिकारी भुसावळ नगरपालिका यांच्याकडे पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे.