कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी व श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास केंद्र यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी व श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. मा.प्राचार्यांनी निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी व महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवन व कार्याचा तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील जीवन तत्त्वज्ञान या विषयावर प्राध्यापक दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले ” अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करून श्री चक्रधर स्वामी यांनी तत्कालीन कालखंडात केलेले समाज प्रबोधन कार्य तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरींनी आपल्या काव्यातून मांडलेले जीवन तत्त्वज्ञान विद्यमान काळातही मोलाचे आहे.” सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.जतीन कुमार मेढे मराठी विभागाचे प्राध्यापक दिनेश पाटील. यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.