लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल –


भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित करणारे इसम तसेच सहकार्य करणारे नातेवाईक व मित्रांविरुद्ध पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित रोहन राजू भोई असे नाव त्यास असून अटक करण्यात आली.

याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील संशयित इसम राजू भोई याने पीडित महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक संबध प्रस्तापित करून तिच्या सोबत आजपावेतो लग्न केलेले नाही व तिच्या अज्ञात पणाचा व परिस्थितीचा गैर फायदा घेवून संशयित राजू भोई याने व त्याचे नातेवाईक व मित्र यांनी संशयितास वेळोवेळी गुन्ह्यात मदत करून पीडित मुलीस जातीवाचक शिवीगाळ केली व पीडित मुलीची आई,भाऊ यांना जिवंत ठेवणार नाही व तुमचे घर पेटवून देवू अशी धमकी दिली म्हणून पीडित मुलीने बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार ता.१४ रोजी सद्न्हाए सात वाजेला दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी संशयित राजू भोई यास अटक केली असून मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली असून गुन्ह्यातील चार संशयित इसम हे फरार आहेत.गुन्ह्याचा अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित करीत आहे.