ताप्ती पब्लिक स्कूल तर्फे सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल ताप्ती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. शहरातील मिलीटरी कॅम्पमध्ये जाऊन तेथील जवानांना राखी बांधून औक्षण केले. तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून औक्षण केले. त्यानंतर शाळेत येऊन शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत ने आण करणारे सर्व वाहन चालक यांना राखी बांधून औक्षण केले. या वेळी प्रिंसीपल निना कटलर,व्हॉईस प्रिंसीपल श्रद्दाली घुले,मनप्रीत कौर,हर्षला चौधरी व शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील मिलिटरी स्टेशन मध्ये सैनिकांना राखी बांधताना ताप्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सोबत प्रिन्सिपल निना कटलर.