भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वेचे सेवानिवृत्त राज शिष्टाचार अधिकारी व रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष गजानन ठाकूर यांना अकोला येथे दि ३ रोजी आयपीडीजी रोटरियन राजेंद्र सिंग खुराना यांच्या हस्ते वर्ष २०२४ -२०२५ साठी चांगली कामगीरी केल्या बद्दल उत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर ३०३० चा पुरस्कार देण्यात आला

.या वेळी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र भामरे,डिस्ट्रीक गव्हर्नर ज्ञानेश्वर गव्हाळे,पीडीजी राजीव शर्मा,डॉ.रश्मी शर्मा,आशा वेणूगोपाल, राजेसंग्रामसिंग भोसले,पीडीजी किशोर केडीया,शब्बीर शाकीर,महेश मोकाळकर व डिजीई डॉ राजेश पाटील,आनंद पाटील,रोटरी क्लब अध्यक्ष संजय चापोरकर,सचीव रत्नाकर क्षीरसागर,मदन बोरकर,गजानन सेवलकर,अशोक निकम,प्रा दयाधन राणे उपस्थित होते.या आधी पण गजानन ठाकूर यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल बरेचसे रोटरीचे पुरस्कार मिळाले आहेत.
फोटो ओळ – अकोला येथे गजानन ठाकूर यांना उत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर ३०३० चा पुरस्कार देताना आयपीडीजी रोटरियन राजेंद्र सिंग खुराना सोबत पीडीजी राजेंद्र भामरे आदी.


