भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांमध्ये व परिसरात विद्यार्थ्यांना होणारा त्रास व अन्याय याबाबत समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना उदभवणारे सायबर प्रश्न , सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या समस्या , तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन कसे करावे सुरक्षिततेबाबत अन्य विषयांचे मार्गदर्शन बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या समन्वयाने करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली .

बाजारपेठ पोलीस स्टेशन प्रांगणात सोमवार दिनांक २८ जुलै रोजी आयोजित महिला दक्षता समिती बैठकीत उपस्थित समिती सदस्यांना या पथकात होणारे कार्य कश्या व कोणत्या स्वरूपाचे असेल याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले केले . या पथकामध्ये पोलीस निरीक्षक राहुल वाघ , महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे, पोलीस उपनिरीक्षक पाटील , यांचे सह पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी व महिला दक्षता समिती व दामिनी पथकातील महिलां सदस्यांचा समावेश राहील. दामिनी पथक विविध विषयांवर कार्य करीत आहे व यापुढे देखील महिला दक्षता समिती सदस्यांच्या सहकार्याने अधिकाधिक कार्य करून विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच , सायबर प्रश्न सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी , यासह ट्रॅफिकचे काही नियम विद्यार्थ्यांना असलेले काही त्रास यावर मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याचे सांगीतले . महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे यांनी पथकाने करावयाचे कामकाज बाबत सविस्तर माहिती दिली .
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल वाघ , महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भारती काळे , पोलीस उपनिरीक्षक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते तर महिला दक्षता समिती सदस्यां राजश्री सोनवणे , संगीता भामरे , राजश्री सुरवाडे , संध्या चंदेल , आरती जोहरी , उज्वला बागुल , जयश्री चौधरी , चेतना फालक , भारती गोसावी , सुरेखा ठाकूर , टिना धांडे यांचेसह महिला दक्षता समिती सदस्या उपस्थित होत्या . बैठक यशस्वितेसाठी पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे , भाऊसाहेव , यांचेसह गोपनीय विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .



