विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करा – सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले :

भुसावळ (२६ जुलै / प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करा , असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांनी येथे केले. शहरातील एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये परिवहन समितीची सहविचार सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भुसावळ शहर वाहतूक सहाय्यक निरीक्षक उमेश महाले, पालक प्रतिनिधी चेतन आमोदकर, संस्थेचे सेके्रटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईंट सेकेटरी प्रमोद नेमाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे, रिक्षा चालक प्रतिनिधी राजेंद्र बोरोले, बस प्रतिनिधी योगेश कोळी सर्व रिक्षाचालक परिवहन समितीच्या सभेस उपस्थित होते
सभेत सर्व रिक्षा चालकांनी विद्यार्थी परवाना काढणे, आपल्या रिक्षांना दोन्ही बाजुने जाळ्या लावून घेणे, प्रत्येक वाहनाचा रंग पिवळा असणे, रिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना फ्रंट सिट न बसवणे, रिक्षेमध्ये वाहतूक नियमानुसार मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवणे आदींबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

इंग्लिश मिडीयम स्कुलमधील सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. आभार धनश्री महाजन यांनी मानले.