गणेश मंडळांना विमा संरक्षण द्या – शिशिर जावळे यांची मागणी ; मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना पाठवले पत्र ;

भुसावळ (२६ जुलै प्रतिनिधी ) –

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून नुकतीचमान्यता देण्यात आलीय. तसेच गणेशोत्सवासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असल्याच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.आशिष शेलारजी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल आहे.गणेशोत्सवाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा ही अनेक वर्षांची गणेश मंडळांची मागणी त्याची पहिली पायरी म्हणून राज्य सरकारने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे.

या निर्णयानं महाराष्ट्रातील गणेश मंडळ आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसत आहे .
राज्यातील गणेशोत्सवामध्ये उत्सव काळात, गणेश मिरवणुकांमध्ये तसेच विसर्जना वेळी अनेक अप्रिय घटना घडत असतात आणि पूर्वीसुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा गणेश भक्तांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. विविध गणेश मंडळ लाखो रुपये खर्चून समाजाभिमुख विविध उपक्रमांसाठी चे आवश्यक देखावे सादर करीत असतात. यांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये या उत्सव काळात कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून गणेश मंडळ आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विमा संरक्षणाची अत्यंत नितांत आवश्यकता भासत आहे.
म्हणून महाराष्ट्र राज्यातील गणेश मंडळ आणि कार्यकर्त्यांना गणेशोत्सव 2025 पूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे विमासंरक्षण देण्यात यावे व त्यासाठी विशेष तरतूद करावी.
अशा आशयाचं विनंती पत्र भाजपा प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट आशिष शेलार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी कळविलेले आहे.