भुसावळात गोमातेच्या पूजनाने देशी गोमाता गोवंश जतन गोसंर्वधन दिन गोसेवक व गोभक्तांनी केला साजरा ;

भुसावळ।(प्रतिनिधी ) – गोमातेचे पुजन करून 22 जुलै देशी गोमाता गोवंश जतन गोसंर्वधन दिन येथील गोसेवक रोहित महाले व सर्व गोसेवक व गोभक्तांनी साजरा केला .

राज्यशासनाने गोमातेला राज्यमाता म्हणुन घोषित केलेले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद देत पशुसंवर्धन मंत्री गोभक्त सौ पंकजा मुंडे यांनी 22 जुलै हा दिवस शुध्द देशी गोमाता व गोवंश गोसंवर्धन करणे जाहीर केला असुन गोशाळा व गोसेवकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे

या अनुषंगाने शहरातील गोसेवक व गोभक्तांनी एकत्रित येऊन अष्टभुजा मंदीरा जवळ अष्टभुजा देवी मातेची आरती झाल्यावर प्रसाद नऊ किलो बुंदीचे लाडु व शेव (प्रसाद ) वाटप करत जल्लोषात साजरा केला प्रसादाची व्यवस्था योगेश वासुदेव पाटील यांनी केली तर मंडप साहित्य किरण मिस्त्री यांनी सेवा दिली

लाखों गोमातेचे प्राण वाचविणारे समस्त हिंदू आघाडीचे प्रख्यात गोरक्षक मिलीदजी एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कत्तलीपासुन गोमाता गोवंश वाचविणे तसेच ज्यांना आपली गोमाता गोवंश गोशाळेत सोडायचे असल्यास ते देखील गोशाळेत सोडण्याचा खर्च एकबोटे राज्यभरातील गोरक्षकांना मदत करतात यावेळी गोभक्त माता भगिंनी सह गोसेवक जितु जाट महेश वाघमारे रुषिकेश वाघमारे रोहित महाले कुणाल शिंदे बल्लु धायडे सौरव यादव अनिकेत राजपुत आदी गोसेवक उपस्थित होते . आपली गोमाता नंदीदेव शेवटच्या श्वासापर्यंत घरीच ठेवावे कुठल्याही परिस्थितीत चुकिच्या हातात न‌ देता थेट गोशाळेत सोडावे असे आवाहन यावेळी मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी केले आहे