खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ; तीन मोटरसायकली १४ मोबाईलसह आरोपी जेरबंद ;

कल्याण – .खडकपाडा पोलीस ठाण्याने एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीसह एकूण १२,५०,०००/- रू. किमंतीच्या एकूण ०३ मोटारसायकली व १४ मोबाईलअसा मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीस अटक केली आहे .

कल्याण -खडकपाडा पोलीस ठाण्याने एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीसह एकूण १२,५०,०००/- रू. किमंतीच्या एकूण ०३ मोटारसायकली व १४ मोबाईलअसा मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीस अटक केली आहे .

अटक केलेला आरोपी अल्पवयीन असून गाझी उर्फ टक्की लकीर हुसेन, वय १९ वर्षे असे नाव आहे .

खडकपाडा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०६/२०२५, बी. एन. एस. कलम ३०३ (२) या गुन्हयात चोरीस गेलेल्या होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल क्रमांक एम. एच. ०५ ई.के. ३३०५ या मोटार सायकलचा व आरोपीताचा शोध घेत असता स.पो.नि. विजय गायकवाड यांना प्राप्त गोपीनय माहितीचे आधारे संशयीत इसम गाझी उर्फ टक्की लकीर हुसेन, वय १९ वर्षे, याच्या ठावठिकाण्याचा शोध घेवुन व त्यास ताब्यात घेतले . त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने सदरचा गुन्हा त्याचे दोन विधी संघर्षग्रस्त साथीदारांसह केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
आरोपीतास अटक करून त्याचेकडे केलेल्या अधिक तपासामध्ये त्याने नमुद गुन्हयातील चोरी केलेल्या होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल क्रमांक एम.एच. ०५ ई.के. ३३०५ या मोटार सायकल व्यतिरीक्त आणखी दोन मोटार सायकल अंदाजे ५.२५ लाख रुपये किंमत असलेल्य या वाहनांमध्ये खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील होंडा अ‍ॅक्टीव्हा, भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील बजाज पल्सर NS, तसेच शिळ-डाईघर पोलीस ठाण्यातील रॉयल एनफिल्ड हंटर यांचा समावेश आहे तसेच विविध कंपनीचे एकुण १३ मोबाईल अंदाजे २.३४ लाख रुपये किमतीचे मुंबई, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर भागात फोन चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. त्यानुषंगाने त्याचेकडुन खालील नमुद वर्णनाच्या एकुण ३ मोटार सायकल व एकुण १४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत

ही कारवाई २३ जुलै २०२४ रोजी करण्यात आली असून, संबंधित गुन्ह्याची नोंद गुन्हा रजि. क्र. ६०६/२०२४, कलम ३७९ भादंविनुसार करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई एसीपी कल्याण घेटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कल्पना भांगरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डॉ. अमरनाथ बंगाळे, वरिष्ठ निरीक्षक विजय गायकवाड , पोलीस अंमलदार अमोल जाधव गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक अजित कदम, पोलीस शिपाई वैभव यादव, संदीप पाटील, हर्षल कुदळे आणि प्रशांत पाटील यांनी केली आहे .

या कौशल्यपूर्ण तपासामुळे चोरीचे महागडे मोबाईल्स आणि दुचाकी वाहने पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.