जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी १९ जुलै रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगीला मागील एक वर्षांपासून संशयित निखील लिलाधर कोळी (वय २० रा. मोहन टॉकीजजवळ, जळगाव) हा लैंगिक अत्याचार करीत होता. या नराधमाने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या वेळोवेळी अत्याचार केले. अत्याचारातून पिडीत मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे १८ जुलै रोजी उघडकीला आले. या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार शनीवारी १९ जुलै रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी निखील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.


