कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; २२ लाखांचा मेफेड्रॉन व गांजासह तीन तरुणांना अटक!” ;


कल्याण (प्रतिनिधी ) –
पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण यांच्या विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने परिमंडळ हद्दीत अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मोठी कारवाई केली आहे:
यामध्ये दिनांक: १८/०७/२०२५ रोजी सुमारे ४ :४५ वा.
फोर्टीस हॉस्पिटलसमोर, ए.पी.एम.सी मार्केट मागील रस्ता, कल्याण (प.) या भागात विशेष पथक गस्त घालत असताना दोन संशयित इसम यात ‘मेफेड्रॉन (एम.डी)’ हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करीत ताब्यात घेतले असता तपासात यांच्याकडून ११० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) सापडला, ज्याची अंदाजे बाजार किंमत २२,/-लाख इतकी आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद कैफ मन्सुर शेख (वय २४)
रा. मेहेक मंजील, रूम नं. ९, दुसरा मजला, बैलबाजार, कल्याण (प.)
व दुसरा संशयीत आरोपी फरदीन आसीफ शेख (वय २४)
रा. ड्रिम कॉम्प्लेक्स, बी-०१, रूम नं. २, कोनगाव, भिवंडी यांचे विरुद्ध
गु.र.नं. ४३७/२०२५
कलम अन्वये एन.डी.पी.एस कायदा कलम ८(क), २२(क), २९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास बाजारपेठ पोलीस ठाणेमार्फत सुरू आहे.
दुसऱ्या प्रकरणात दिनांक १७/०७/२०२५ रोजी ५ .४५ वा. योगीधाम-अमृतधाम सोसायटी मार्ग, साई दर्शन ढाब्यासमोर, वालधुनी नदी किनारा, खडकपाडा, कल्याण (प.)
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपी रवि शिवाजी गवळी (वय ३०) हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी तातडीने धाव घेतल्यावर त्याच्याकडून ११२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत ₹२५,०००/- इतकी आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी रवि शिवाजी गवळी
रा. अनुपमनगर, जयदुर्गे चाळ, मोकळ्या मैदानालगतची भाडोत्री खोली, खडकपाडा, कल्याण (प.), जि. ठाणे यास अटक केली असून खडकपाडा पोलीस ठाणे येथें
आरोपी विरुद्ध गु.र.नं. ५९८/२०२५
कलम: एन.डी.पी.एस कायदा कलम ८(क), २०(ब), गा(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास खडकपाडा पोलीस करीत आहे .
वरील दोन्ही कारवाया परिमंडळ ३, कल्याण विशेष पथक पोलीस आयुक्त अतुल झेंडे , पोलीस उपआयुक्त , कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नाईक , पोलीस निरीक्षक श्री डुकले , सपोनिi अनिल गायकवाड आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. परिमंडळ हद्दीत अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात अशा प्रकारच्या कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरूच राहतील असा इशारा पोलीस उपआयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिला आहे.

पोलीसांचा इशारा: कठोर कारवाया सुरूच राहणार – उपआयुक्त कल्याणजी घेटे.. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात अशी कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरुच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. युवकांचे भवितव्य घडवण्यासाठी आणि समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा पोलिसांचा निर्धार निश्चितच कौतुकास्पद आहे.