शहरातील काही भागात भरदिवसा स्ट्रीट लाईट सुरू – मुख्याधिकारी यांना निवेदन :

भुसावळ शहरातील काही भागात स्ट्रीट लाईट दिवसा सुद्धा सुरू असतात या बाबतची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याकडे केली आहे .
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शहरातील काही भागातील लाईट दिवसा सुरू असल्याने बिलाचा भार नगरपालीकेवर म्हणजेच कराच्या रूपाने नागरीकावर पडत आहे .
अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असुन या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक सामाजिक सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केली आहे .