सन्मान आपल्या कर्तृत्वाचा” कार्यक्रमात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नवनियुक्त सदस्यांचा गौरव –

भुसावळ – प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव (पूर्व) यांच्या वतीने रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी “सन्मान आपल्या कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा महाराष्ट्र राज्य परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभ नामदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “निसर्ग पर्यावरण संगोपन प्रणाली” व “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून उपस्थित सर्व मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती खालीलप्रमाणे होते.

हिरालालजी चौधरी

मधुकरजी राणे

गोमतीताई बारेला

विकासजी अवसरमल (छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्राप्त)

नवनिर्वाचित शहराध्यक्ष संदीप सुरवाडे (उत्तर)

किरण कोलते (दक्षिण)

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व गरज याविषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रशांत निकम (सरचिटणीस) यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी केले.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
जिल्हा सरचिटणीस अर्जुन वाघ, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, कैलास सुरवाडे, चेतन सावकारे (विधानसभा क्षेत्र प्रमुख), नगरसेवक कैलास नरवाडे, सुभाष सुरवाडे, बबलू घारू, अनिल डांबरे, संतोष ठोकळ, रविंद्र दाभाडे, प्रेमचंद तायडे, राकेश सपकाळे, रविंद्रनाथ खरात, भरत उमरिया, विशाल गव्हाळे, विनोद वाघोदे, सुरेंद्र पालवे, किरण सोनवणे, संतोष मेढे, संजय वाघ, बाळू इंगळे, योगेश जोहरे, राजेश साळूंके, किरण वसंत सोनवणे, नगीन वाघ, आकाश भालेराव, मयुर लोणारी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “उत्कृष्ट उपक्रमातून सन्मानित होणे ही गौरवाची बाब आहे आणि या प्रेरणेतून सामाजिक कार्याला बळ मिळते.”

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव (पूर्व) येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.