शाळेच्या रिक्षातून विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेला ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद;भुसावळातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज गुरुवार रोजी शहरातील खाचणे हॉलच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी नेत असताना, शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा चालकाने अतिवेगाने वळण घेतले. यावेळी अचानक रिक्षामधील एक लहान मुलगा रिक्षाच्या उजव्या बाजूने रस्त्यावर फेकला गेला.सुदैवाने अनर्थ टळला . मात्र या घटनेमुळे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षामध्ये कोंबणाऱ्या रिक्षाचालकांबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे .

दि. १० जुलै रोजी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी नेत असताना, रिक्षा चालकाने अतिवेगाने वळण घेतले. यात रिक्षामधील एक लहान मुलगा रिक्षाच्या उजव्या बाजूने रस्त्यावर फेकला गेला. सुदैवाने मुलास जास्त इजा झाली नाही . ही घटना रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली , दरम्यान रिक्षाचालकाचे लक्षात ही बाब आली मात्र तात्काळ रिक्षा न थांबवल्याने त्याचा निष्काळजीपणा स्पष्ट जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून पालक चिंतीत आहे ने आण करणाऱ्या रिक्षाचालक व व्हॅन चालकांनी त्वरित सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्या याकरिता पोलीस व पालिका प्रशासन तसेच आर टी ओ विभागाने सुद्धा सहकार्य करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे .