भुसावळातील हॉकर्सवर होणाऱ्या अन्याया निषेधार्थ शिवसेना उबाठा तर्फे अभियंता यांना निवेदन देणार ..

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपालिकेने शहरात जे गोरगरीब हातगाडीवाले यांचेवर अन्याय करून अहिल्यादेवी कन्याशाळे पासुन ते अप्सरा सारी सेंटर पर्यन्तचे रोडचे काम सुरू असुन,त्यात डिव्हायडर करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे हातगाडीधरक विक्रेत्यांवर होणाऱ्या अन्यायाचे निषेधार्थ उप अभियंता यांना निवेदन देण्यात येणार आहे आहे .
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमूख सन्माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांचे आशिर्वाद तसेच शिवसेना उपनेते संजय सावंत , उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाब वाघ जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनात मंगळवार दिनांक 8/07/2025 रोजी रोजी सकाळी ठीक 11 वाजत भुसावळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (तार ऑफिस रोड) येथील अधिकाऱ्यांना भुसावळ नगरपालिकेच्या व शहरात जे गोरगरीब हातगाडीवाले यांचेवर अन्याय करून अहिल्यादेवी कन्याशाळे पासुन ते अप्सरा सारी सेंटर पर्यन्तचे रोडचे काम सुरू असुन,त्यात डिव्हायडर करण्याचे काम सुरू केले आहे. त्या निषेधार्थ उप अभियंता यांना तक्रार निवेदन द्यावयाचे आहे

. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमूख निलेश महाजन यांनी केले आहे.