आपले विचार चांगले ठेवा म्हणजे कार्य पण चांगले होईल – प.पू.जनार्दन हरी जी महाराज ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक 21 जून रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी चा भुसावळ प्राईड हा कार्यक्रम पार पडला . प्रसंगी . प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज हे होते. याप्रसंगी महाराज बोलताना म्हटले की आपले विचार चांगले ठेवा म्हणजे आपले कृत्य चांगले होईल असे सत्कृत्य करणाऱ्यांचा आज सत्कार येथे झालेला आहे यातून आपण बोध घेतला पाहिजे तसेच महाराज म्हणाले की फक्त देवाकडे याचना करू नका तर त्यासोबत आपले प्रयत्न सुद्धा चालू ठेवा म्हणजे आपल्याला यश नक्कीच मिळेल.
या कार्यक्रमात सुरुवातीला भुसावळ शहरांमध्ये मागील वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पारंपारिक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर भुसावळ मध्ये मध्यंतरीच्या काळात रोटरी रेल सिटीने ने गुड टच बॅड टच या विषयावरती सुमारे 30 हजार विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षण दिले होते, हे शिक्षण भुसावळ मधील सर्व स्त्री रोग तज्ञांनी विनामूल्य दिलेले होते,अशा सर्व स्त्री रोग तज्ञांचा सत्कार सुद्धा महाराजांच्या हस्ते करण्यात आला. मा. ना. संजय भाऊ सावकारे यांचा पारिवारिक सत्कार सुद्धा महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
भुसावळ प्राईड मध्ये यावर्षी दोन व्यक्ती व एक संस्था यांना सन्मानित करण्यात आले.प्रथम व्यक्ती डॉक्टर श्री अविनाश विठ्ठल पाटील उर्फ बाळू डॉक्टर. यांना ते लिलाई हॉल येथे चालवीत असलेल्या मोफत दवाखान्याबद्दल त्याचप्रमाणे त्यांनी भोरगाव लेवा पंचायत मध्ये सलग चौदा वर्ष सचिव असताना अनेक विवाह बद्दलचे तंटे सोडवून सुमारे 82 नवविवाहित महिलांना त्यांच्या संसारात परत पाठवले याबद्दल तसेच खानदेश अंध्यकल्याण समितीद्वारे भुसावळ शहरातील अंध व्यक्तींना दरसाल मदत करणे त्याशिवाय अंध व्यक्तींच्या मुलांचे विवाह जुळवून ते पार पाडणे या बद्दल सन्मानित करण्यात आले.

दुसरे मानकरी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा भुसावळ ही संस्था होती. या संस्थेने मागील अनेक वर्षांमध्ये विनामूल्य अन्नदानाचे लंगर चालवण्याचे काम केलेले आहे. यात प्रामुख्याने ज्यावेळेस भुसावळ शहरातील हद्दीवली चाळ व आगिवली चाळ येथील अतिक्रमण उठवण्यात आले होते त्या रात्री सुमारे दहा हजार निर्वासित व्यक्तींना जेवण पुरवण्याचे काम या संस्थेने केले होते.त्याचप्रमाणे सात आठ वर्षाच्या पूर्वी गणपती व नवदुर्गोत्सव साठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचा दोन दिवस चहा, नाश्ता आणि जेवण याची सुविधा करणे त्याचप्रमाणे भुसावळ शहरात इंटरव्यू साठी,ट्रेनिंग साठी आलेल्या व्यक्तींच्या निवासाची व जेवणाची सोय करणे इत्यादी कामे ही संस्था करत आली आहे. याशिवाय या संस्थेद्वारे आर्थो बँक फुकट चालवली जाते,याद्वारे रुग्णपयोगी साहित्य गरजूंना फुकट वापरण्यासाठी या संस्थेद्वारे दिले जातात म्हणून या संस्थेला सुद्धा सन्मानित करण्यात आले.

तिसरे सन्मानार्थि अजय रामदास आंबेकर हे एलआयसी मध्ये हेड क्लर्क म्हणून नोकरीला आहेत. परंतु त्यांचा जो छंद आहे रनिंगचा.. त्यामध्ये त्यांनी 2023 सालच्या सातारा येथील मॅरेथॉन मध्ये एका अनोळखी धावपटूला धावताना हार्ट अटॅक येत असताना आपली स्वतःची मॅरेथॉन सोडून त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत केली होती, त्यानंतर त्यांनी आपला रनिंगचा छंद चालू ठेवत असताना मोठ्या रनिंग मध्ये मात्र फक्त सपोर्ट सिस्टम म्हणून काम अंगीकारले आहे. भुसावळ मधील मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्या धावपटूंसाठी एनर्जी ड्रिंक,केळे,खजूर हे त्या रस्त्यात त्यांना द्यावे,त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे काम ते मागील दोन वर्षापासून करीत आहेत. नुकतेच डॉक्टर तुषार पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली त्यांच्या या मॅरेथॉन साठी सराव करत असताना सुमारे दोन महिने सपोर्ट सिस्टम म्हणून अजय आंबेकर यांनी मदत केली होती, डॉक्टर तुषार पाटील हे त्यांना कोच,गुरुस्थानी मानतात आणि यावर्षीचा कॉम्रेड मॅरेथॉनचा पुरस्कार हा त्यांनी त्यांना समर्पित केलेला आहे म्हणून श्री अजय आंबेकर यांना सुद्धा भुसावळ प्राईड या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.


व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन हरी जी महाराज यांचे सोबत माननीय नामदार संजय भाऊ सावकारे व त्यांचा परिवार तसेच रोटरी रेल सिटी चे अध्यक्ष विशाल शहा,सेक्रेटरी अनिल सहानी व प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे हे होते .
गणपती उत्सवाचे पुरस्कारार्थी1) पंकज शांताराम नेवे 2)सुषमा महेश भारंबे.3) भाग्यश्री रोशन फालक. गुड टच बॅड टच या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर्स खालील प्रमाणे डॉक्टर मनीषा दावल भक्त, डॉक्टर वृषाली चौधरी, डॉक्टर चेतन ढाके,डॉक्टर नीलिमा नेहते, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर अर्चना खानापूरकर, डॉक्टर सुवर्णा गाडेकर, डॉक्टर दिपाली गोठवाल, डॉक्टर दीप्ती चौधरी,डॉक्टर दीपा रत्नानी .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश न्याती,प्रमुख पाहुणे परिचय डॉक्टर राहुल पांडे तर आभार प्रदर्शन देवा वाणी यांनी केले. या कार्यक्रमाला सुमारे 200 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.