भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात एका युवकाने आपल्या आईवर झालेल्या धार्मिक आणि सामाजिक अपमानाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अश्लील व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या आरोपीवर कारवाईची मागणी होत असून, संपूर्ण घटनेने समाजमन संतप्त झाले आहे.

याबाबत सविस्तर असे की भुसावळ येथील साईचंद्रनगर परिसरात राहणाऱ्या प्रियदर्शी शशिकांत रंधे (वय १९) या तरुणाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याची आई सारिका हिने २०२१ मध्ये शुभम प्रकाश चौधरी (रा. जुना सातारा, मामाजी टॉकीज जवळ) याच्याशी विवाह केला होता. त्या दोघांना एक मुलगी आहे व , शुभम सध्या त्यांच्याबरोबर राहत नाही.
दिनांक ०९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास शुभम चौधरी याने सारिकाला फोन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि जातीय द्वेष निर्माण करणारी भाषा वापरली. संभाषण दरम्यान, त्याने बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांच्या कार्याची टर उडवली. हे संभाषण प्रियदर्शीच्या भावाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.यानंतर, दिनांक १४ एप्रिल रोजी, आंबेडकर जयंतीच्या दिवशी, शुभम चौधरी पुन्हा त्याच्या घरी येऊन सारिकाला “तु बाबासाहेबांचे स्टेटस का लावले?” अशी विचारणा करत का जातेस तू जयंतीला?” असे एकेरी उल्लेख करत सामाजिक भावना दुखावणारे वक्तव्य केले .
प्रियदर्शी रंधे याने आपल्या तक्रारीत नमूद केले की, सदर प्रकाराने त्म माझ्या कुटुंबासह संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या असून, आरोपीवर त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी.अशी मागणी केली आहे
या प्रकारामुळे स्थानिक दलित समाजात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. भुसावळ शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.


