नाशिकमध्ये कोयता गँग ; एकावर भर दिवसा जीवघेणा हल्ला;

नाशिक –

पुण्यानंतर आता नाशिकमध्येही कोयता गँगची एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये कोयता गँगने एकावर जीवघेणा हल्ला केला आहे. भरदिवसा सात ते आठ जणांनी हातात कोयता घेऊन हल्ला केला आहे. कोयता गँगच्या हल्ल्यानंतर परिसरात नागरिक भयभीत झाले आहेत .

नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात भर दिवसा टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने कोयता आणि चॉपरने युवकावर हल्ला केला आहे. भरदिवसा सात ते आठ जणांनी एकावर हातात कोयता घेऊन हल्ला केला आहे. या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी कोयता गँगमधील घटनास्थळावरील दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.