भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची 173 वी बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समिती ((DRUCC) ची 173 वी बैठक विभागीय कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्राशी संबंधित प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वेशी संबंधित समस्या लवकरात लवकर सोडविणे यावर सकारात्मक चर्चा केली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांनी भुसावळ विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित सदस्यांना दिली. त्यांनी मान्यवर सदस्यांना आश्वस्त केले की, प्रवासी सुविधा वाढविणे हे भुसावळ विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. सदस्यांनी मांडलेल्या योग्य मागण्यांवर लवकर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान भुसावळ विभागाने मिळविलेल्या यशाबाबत तसेच प्रवासी सुविधांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रातील रेल्वे समस्या, नवीन गाड्या सुरू करणे, गाड्यांचे थांबे वाढविणे, गाड्यांचे विस्तार करणे आणि विभागातील स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या मौल्यवान सूचना दिल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांनी सदस्यांच्या योग्य मागण्यांवर त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

या बैठकीस राजेश भराड़े (भुसावळ), नीरव वोरा (अकोला), मनीष करवा (अमरावती), अशोक अग्रवाल (मलकापूर),. जितेंद्र देशमुख (चाळीसगाव), विजय मोहरीर (जळगाव), सुश्री माधुरी शर्मा (शेगाव), उन्मेष मालू (अकोला), अनिरुद्ध कुलकर्णी (भुसावळ), पंकज नाटानी (बुरहानपूर), कुंदन यादव (अमरावती) आणि राजेश अग्रवाल (शेगाव) उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी उपस्थित राहून मौल्यवान सूचना दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) . सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.