तुम्हाला मिळालेल्या अवार्डमुळें तुमचा रिवार्ड वाढेल.- आयुष प्रसाद : जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते लोक उदय सन्मान प्रदान.

चोपडा प्रतिनिधी – समाज सेवेचे व्रत जोपासून लोक उदय फौंडेशन ने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांचा जो सन्मान देऊन सत्कार केला.ते बघून अतिशय आनंद होतोय.मी तर असं म्हणेल शासनाने सत्कार केलेल्या लोकांना आवार्ड मिळाला आणि लोक उदय फौंडेशनच्या सन्मानाने आज तुम्हाला रिवार्ड मिळाला असे उदगार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चोपडा येथील लोक उदय सन्मान सोहळ्यात बोलतांना काढले.

माजी पोलीस उपायुक्त व महाराष्ट्रातील नामवंत पोलीस अधिकारी म्हणून मंगलसिंग सुर्यवंशी या सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.त्यांनी ही लोक उदयचे अध्यक्ष सुनील पाटील (वाळकीकर) यांच्या बद्दल भाषणात सांगितले की सुनील नावाचा अर्थ श्रीकृष्ण व हा कार्यक्रम ही हॉटेल वृंदावन मध्ये आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती आणि आयुष म्हणजे ही दीर्घायु आजचा किती हा योगायोग अतिशय सुंदर कार्यक्रम आज मला येथे अनुभवायला मिळाला असे उदगार माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांनी यावेळी काढले. तालुक्याचे माजी आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मनोज चित्रकथी व कोळबा येथील भजनी मंडळाने महाराष्ट्र गीत गाऊन केली.
चोपडा तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील एकूण बावीस सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यात प्रवीण माळी आदर्श शिक्षक,सुमनबाई भीमराव पाटील सेवानिवृत्त शिक्षिका,विजया यशवंत पाटील,(शिक्षिका,)अरुण सुहास देवराज,(शिक्षक)जगदीश सीताराम महाजन,(शिक्षक)भरत भीमराव शिरसाठ(शिक्षक)पंकज प्रतापराव शिंदे(शिक्षक)सोनाली मधुकर साळुंखे(शिक्षिका)ईश्वर मधुकर राजपूत(शिक्षक)भालचंद्र पवार(शिक्षक)संजीव हिरामण पाटील(ग्रामविकास)मुश्ताक खान सरफराज खान(शिक्षक)शीतल रणजित जाधव(शिक्षिका)चंद्रशेखर निंबजी सोनवणे(ग्रामविकास)बापू भागवत कोळी(ग्रामविकास)चंद्रकांत सुलताने(ग्रामविकास)मनोहर पंढरीनाथ पाटील(ग्रामविकास)दिनेश पाटील(ग्रामसेवक)भैय्यासाहेब साळुंखे(ग्रामविकास)सुधाकर चौधरी(ग्रामविकास)राकेश सोनवणे(ग्रामविकास)पल्लवी जगतराव शिंदे(शिक्षिका)राकेश राजकुमार विसपुते(कलाशिक्षक)अर्जुन कोळी(शिक्षक)किरण रघुनाथ पाटील(शिक्षक)माला सोनवणे(शिक्षिका)संजय हरी पाटील(शिक्षक)सुनीता भाईदास पवार(शिक्षिका)पठाण नईम खान युसूफ खान(शिक्षक)दीपक मेढे(शिक्षक)दिनेश बाविस्कर(शिक्षक)महेंद्र योगराज महाजन(कृषी)जितेंद्र सनेर(कृषी)नरेंद्र जाधव(कृषी) कैलास देशपांडे(कृषी) विलास मोरे(कृषी)राजेंद्र निकम(कृषी)दीपक राजपूत(शिक्षक)जितेंद्र एकनाथ मोरे(बेस्ट कोतवाल)कुंदन कुमावत(ग्रामविकास)डी आर सैदाने(नायब तहसीलदार)सचिन वाम्बळे(ना.तहसीलदार)विपुल पाटील(वनविभाग)यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्वच समाजातील घटकांचा सन्मान करण्यात आला व महिला व पुरुषांच्या डोक्यावर फेटे बांधण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील पाटील (वाळकीकर) यांनी केले तर योगेश सनेर ग.स.संचालक व संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी कार्यक्रमास तहसीलदार भाऊसाहेब थोरात,पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,रमाकांत सोनवणे,किरण करंदीकर,ऍड दिनेश पाटील,तुकाराम पाटील,रावसाहेब पाटील (वेले)किशोर पाटील,रविंद्र पाटील (उपसरपंच)अनिल पाटील सर,सतीश बोरसे,पत्रकार मिलिंद सोनवणे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.