जळगाव – राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न
अडीच लाख रुपये पेक्षा कमी आहे. अशा महिलांच्या उन्नती साठी राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत महिलांचे (लाडक्या बहिणींचे) हे मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार असल्याचं महायुती सरकारकडून आश्वासन दिलं गेलं होतं. व त्यामुळे त्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिला भगिनींनी महायुती सरकारलाच मतदान केले व त्याच मतदानाच्या जीवावर पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे . पण प्रत्यक्षात मात्र निवडणुकीनंतर गेले दोन महिन्याचे मानधनहि महिलांच्या खात्यात जमा करण्यास सरकारला अपयश आले आहे. आणि महायुती सरकारकडून 2100 रुपयाचे देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात 1500 रुपये मानधनच महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने या सरकार कडून महिलांची अपेक्षाभंग करण्यात आली आहे.
तेव्हा आमची अशी मागणी आहेकी, शासनाने लाडक्या बहिणींचे थकित असलेले व आश्वासन दिल्या नुसार 2100 रुपये मानधन त्वरित महिला भगिनींच्या खात्यात त्वरित जमा करावेत व बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे.
अशी मागणी शिवसेनेच्या राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील व धुळे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी जयश्रीताई वानखेडे, संगीताताई जोशी, अरुणाताई मोरे, तारकाताई विवरेकर, ज्योतीताई चौधरी, सुनिता ताई वाघ आदी महिला पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



